मधुमेहींसाठी मोफत नेत्र शिबीर, ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होणार नोंद

जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

ठाणे : येथील आयबेटिक्स फाउंडेशन आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी मोफत नेत्र आणि किडनी तपासणी शिबिर ठाणे टाऊन हॉल येथे होणार आहे. जिल्हाभरातून १५०० हून अधिक रु ग्ण श्बििरात विनामूल्य लाभ घेणार आहेत. हा एक विक्रम असून त्याची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणार आहे. मधुमेहींमध्ये नेत्र व किडनीचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे नार्वेकर आणि फाउंडेशनचे डॉ. निशांत कुमार यांनी सांगितले.

Lokmat-15-JUN-2019-clip

जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व महापालिका, नगर परिषद, हाउसिंग सोसायटी इत्यादी घटक या शिबिराच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. शिबिराला राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. शिबिरात सर्वप्रथम ठाणे मेन्टल हॉस्पिटल येथून येणाºया मधुमेही मनोरु ग्णांची तपासणी केली जाईल. शिबिरामध्ये रुग्ण घेऊन येणाºया आशा सेविका व गटप्रवर्तक यांना प्रति रुग्ण १०० रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. संपूर्ण आरोग्य शिबिराचे नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील व जिल्हा समन्वयक डॉ. तरु लता धानके करत आहेत. तर, जिल्हाधिकाऱ्यांनी या सामाजिक कृतज्ञतेतून होत असलेल्या उपक्र माची गिनीज बुकात नोंद होऊन त्याद्वारे मधुमेहामुळे येणारे अंधत्व व मूत्रपिंड निकामी होणे याबाबत जनजागृती होईल. यासाठी दी ठाणे डिस्ट्रिक्ट को-आॅपरेटिव्ह हाउसिंग फेडरेशन लि. या संस्थेनेही पुढाकार घेतला आहे.

मृत्यू टाळता येतील

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातील रु ग्णांमध्ये मधुमेहामुळे येणारे अंधत्व व किडनीचे आजार याविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा उपक्रम होत आहे. अंधत्व व किडनी निकामी होणे या तक्र ारींसाठी मधुमेह हे सर्वाधिक मोठे कारण आहे. त्यासाठी नियमित नेत्र व किडनी तपासणी केल्यामुळे अनेक जणांना अंधत्व व किडनी निकामी होऊन मृत्यूच्या घटना टाळता येऊ शकतील.

SOURCE: https://www.lokmat.com/